क्षितिज पर्व News

पुण्यात चौथी राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ञांची परिषद…

 

पुणे / दै. क्षितिज पर्व
पुणे येथे रविवार, दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी चौथी राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ञांची परिषद उत्साहात संपन्न झाली. आस्था योगा – निसर्गोपचार, चिकित्सा उपचार, शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन केंद्र, पुणे, डॉ. दिलीप कुमार सामाजिक संस्था तसेच ग्रीन हिल निसर्गोपचार केंद्र, शिराळ यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी निसर्गोपचार विषयक पुस्तक व डायरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृष्णा दामोदर जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या परिषदेस तिसऱ्या राज्यस्तरीय निसर्गोपचार परिषदेचे अध्यक्ष डॉ. हेमंत खेडकर, कार्याध्यक्ष डॉ. चंद्रशेखर पोकळे पाटील, नितीन भिसे, डॉ. ज्योती अविनाश शेटे तसेच सोपान केंद्रे हे मान्यवर उपस्थित होते.

परिषदेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने निसर्गोपचार तज्ञ उपस्थित होते. निसर्गोपचार पद्धतीचे आरोग्यदायी फायदे, जीवनशैलीशी संबंधित आजारांवर निसर्गोपचाराची भूमिका, तसेच शिक्षण, प्रशिक्षण व संशोधनाच्या माध्यमातून या उपचारपद्धतीचा प्रसार करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

निसर्गोपचार ही सुरक्षित, किफायतशीर व परिणामकारक उपचारपद्धती असून समाजात तिचा अधिक व्यापक प्रसार होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Share

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *