पनवेल / दै. क्षितिज पर्व
पनवेल महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मध्ये पत्रकार शंकर वायदंडे यांचे नाव भावी नगरसेवक म्हणून जोरदार चर्चेत आले आहे. त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर ‘भावी नगरसेवक शंकर वायदंडे’ अशी फलकबाजी करून प्रचाराला सुरुवात केली असून, या पोस्ट्सनी स्थानिक पातळीवर चांगलीच खळबळ उडवली आहे.
पंचशील नगरातील लोकप्रियता
पंचशील नगर परिसरात शंकर वायदंडे यांची स्थानिक नागरिकांची विविध कामे वेळेवर पूर्ण करण्याची ओळख आहे. प्रभाग १७ मधील रहिवाशांनी त्यांना उमेदवारीसाठी अग्रस्थानी ठेवले असून, “प्रत्येक घरातील व्यक्तिमत्त्व” म्हणून त्यांचा सन्मान केला जातो.
सोशल मीडिया प्रचाराचा प्रभाव
समर्थकांनी फलकांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले असून, पनवेल महापालिका निवडणुकीच्या तयारीत हा एक रोचक घडामोडीचा भाग ठरला आहे. निवडणूक आयोगाने २९ महापालिकांच्या कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर अशा उमेदवारांची चर्चा वाढत आहे.

संपादक – क्षितिज पर्व
संपर्क – 9594494771