क्षितिज पर्व News

लोकशाही पत्रकार समितीच्या नवनियुक्त कार्यकारिणी मंडळाने घेतली पनवेल तालुक्यातील नेत्यांची सदिच्छा भेट. …

 

मा.आमदार बाळाराम पाटील, मा.आमदार मनोहर भोईर, काशिनाथ पाटील,बबन दादा पाटील, सुदाम पाटील, शिरीष घरत, योगेश चिले ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे आदी मान्यवरांनी दिल्या शुभेछ्या 

पनवेल दि.१७ (वार्ताहर): लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणून पाहिलं जाणारं पत्रकारिता क्षेत्रात नव्या उमेदीने निपक्षपातीपणे काम करणारी पिढी तयार होणे गरजेचे आहे. याच धर्तीवर लोकशाही पत्रकार समितीची स्थापना करण्यात आली असून सा.रायगड सम्राट चे संपादक शंकर वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.

oplus_4456448
oplus_4456448
oplus_4456448

“नवोदित पत्रकारांनी लोकशाहीची मूल्य जोपासत असताना आपल्या लेखणीच्या शैलीने कोणावर अन्याय होणार नाही आणि झाल्यास त्याला वाचा फोडल्याशिवाय शांत बसणार नाही अशा पद्धतीचं काम आपल्या पत्रकारितेच्या कौशल्यातून दाखवून द्यावी तसेच महिला पत्रकारांनीही दडपशाहीला न जुमानता समाजातील अन्याला वाचा फोडणे गरजेचे आहे” असं मत वायदंडे यांनी यावेळी पत्रकारांना संबोधताना व्यक्त केलं. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष सनिप कलोते, उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, उपाध्यक्ष गणपत वारगडा, उपाध्यक्ष अक्षय कांबळे, खजिनदार सुनील वारगडा, सह खजिनदार रोहिता साळुंखे, सचिव दिपाली पारसकर, सह सचिव प्रेरणा गावंड, प्रसिद्धी प्रमुख कृष्णा गायकवाड, संघटक आशिष साबळे, सदस्य प्रकाश मत्रे, सदस्य जितेंद्र नटे, सदस्य अजय दुबे आदी पदाधिकाऱ्यांची निवड झाली असून, पुढील कामकाजाची दिशा ठरविण्यात आली.

Share

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *