आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मुरुड–अलिबाग विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तसेच पक्षप्रवेश मोठ्या दिमाखात पार पडले.महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्षता, सामाजिक समता आणि सर्वांगीण विकासाची दृष्टी पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना केले. सामाजिक सलोखा, शिक्षण, रोजगार, शेतकरी हक्क आणि उद्योजकता हेच पक्षाच्या कार्याचे केंद्रबिंदू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा अध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांनी सांगितले की, येणाऱ्या पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये नवीन तरुणांना व नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारधारेने प्रेरित होऊन “शिव–शाहू–फुले–आंबेडकर” या प्रगतीशील विचारधारेची सांगड अधिक दृढ करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणूनआदरणीय रायगड जिल्हा अध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण सर,जिल्हा सचिव श्री. श्रीहर्ष कांबळे,रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री. निलेशकुमार घरत,महाड तालुका अध्यक्ष श्री.संदीप सकपाळ ,जिल्हा सदस्य श्री. रोहिदास चव्हाण,मुरुड–अलिबाग विधानसभा सरचिटणीस श्री. साईनाथ म्हात्रेयां ची उपस्थिती लाभली.या कार्यक्रमात श्री. सचिन पाटील पळी गावचे माजी सरपंच , श्री. जयराम पारंगे, श्री. प्रविण पाटील, श्री.अमित हवालदार श्री. संदेश चिपळूणकर,श्री. देवेंद्र सावर्डेकर,अक्षय पाथरे,श्री. सचिन पाटीलद,र्शन खोपटकर,विशाल राऊळ,या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रम ठिकाण पळी ,तिनविरा वाशिंग सेंटर समोर,ता.अलिबाग जि.रायगड .येथे
मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

संपादक – क्षितिज पर्व
संपर्क – 9594494771