क्षितिज पर्व News

जागरुकता सत्र, मनोरंजनात्मक खेळ, थेट डॅाक्टरांशी संवाद साधण्यासारख्या उपक्रमांचे आयोजन 

खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये जागतिक मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) दिन उत्साहात साजरा

नवी मुंबई / क्षितिज पर्वत

जागतिक मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) दिनानिमित्त नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्सने “द टायनी मिरॅकल्स” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करत अकाली जन्मलेल्या बाळांच्या धैर्याचा आणि प्रेरणादायी प्रवासाचा सन्मान केला. ब्लू प्लॅनेट येथे आयोजित या कार्यक्रमात डॉक्टर, परिचारिका, पालक आणि ५० हून अधिक चिमुकल्या योद्ध्यांचा समावेश होता.

सामान्यतः मूल आईच्या गर्भात 37 आठवडे राहतं. परंतु 37 आठवड्यांपूर्वीच प्रसूती झालेली मुले अपुऱ्या दिवसांची असतात. म्हणजेच त्यांना प्रिमॅच्युअर बेबी म्हणतात. जागतिक स्तरावर दर दहापैकी एक बाळ अकाली जन्मते. वैद्यकीय प्रगतीमुळे जगण्याचा दर वाढला असला तरी देखील ही एक गंभीर आरोग्यविषयक समस्या आहे.

अकाली जन्मामागची कारणं कोणती याविषयी माहिती देताना *मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे नवजात शिशुतज्ज्ञ व एनआयसीयू इंचार्ज डॉ. तन्मेष कुमार साहू सांगतात की,* एकाधिक गर्भधारणा, गर्भवती मातेला झालेला संसर्ग, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यांसारखे आजार किंवा काही वेळेस अज्ञात कारणांमुळेही अकाली जन्म होऊ शकतो. अशा अर्भकांना श्वास घेण्यास त्रास, संसर्गाचा धोका, दृष्टीदोष आणि दीर्घकालीन विकासात्मक समस्येसारख्या गुंतागुंतींस सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी वेळीच निदान, एनआयसीयू तज्ज्ञांच्या निरीक्षणाखालि देखभाल आणि पालकांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

कार्यक्रमादरम्यान जागरूकता सत्रे, पालक–डॉक्टरांचा संवाद, संपुर्ण प्रवासादरम्यानचे अनुभव सांगणे, काही खास मनोरंजनात्मक उपक्रम आणि लहान मुलांसाठी आकर्षक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांद्वारे पालकांना अकाली बाळांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आणि याठिकाणी उपस्थित तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे महाराष्ट्र व कर्नाटक प्रदेशाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल सांगतात की,जागतिक अकाली जन्म दिन हा या लहान योध्यांचा प्रेरणादायी प्रवास आणि नवजात शिशु विभागातील वैद्यकीय सेवांच्या उलगडा करणारा आहे. मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये जागतिक दर्जाच्या नवजात शिशु सेवा पुरविल्या जातात.

या कार्यक्रमाद्वारे मेडिकव्हर हॉस्पिटल्सने अकाली जन्मलेल्या “चिमुकल्या योध्यांचा” प्रेरणादायी प्रवास साजरा करत त्यांच्या कुटुंबियांचे आणि वैद्यकीय तज्ञांचे याठिकाणी आभार मानले.

Share

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *