क्षितिज पर्व News

शिरढोण पदयात्रेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्त्यांचा सहभाग

सरदार @१५० एकता पदयात्रा ; पनवेल ते शिरढोण पदयात्रेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्त्यांचा सहभाग

पनवेल (प्रतिनिधी) देशाचे पहिले उपपंतप्रधान, भारताच्या एकीचे शिल्पकार आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित “सरदार @१५० – एकता पदयात्रा” आणि विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून उत्तर रायगड भाजपच्यावतीने आज पनवेल ते शिरढोण भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे पदयात्रेला विशेष उत्साह लाभला.

पदयात्रेची सुरुवात पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून करण्यात आली. भारतीय एकीचे प्रतीक असलेल्या या पदयात्रेने पुढे मार्गक्रमण करत शिरढोण येथे पोहोचले. शिरढोण येथे सहभागी मान्यवरांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास अभिवादन करत पदयात्रेचा समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या “विकसित भारत २०४७” या संकल्पनेनुसार देश सर्वांगीण प्रगतीकडे वेगाने वाटचाल करत आहे. राष्ट्राच्या एकात्मतेचे जनक असलेले सरदार पटेल यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, संघटनशक्ती आणि ‘एक भारत, अखंड भारत’ ही त्यांची संकल्पना आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. या भावनेतून राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर “सरदार @१५० एकता पदयात्रा” राबविली जात आहे. महाराष्ट्रात या उपक्रमाची अंमलबजावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संयोजनाखाली होत असून राज्यभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून जयंती साजरी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर रायगड प्रशासकीय जिल्हा स्तरावर आजची पदयात्रा आयोजित करण्यात आली. यावेळी देशभक्तीपर घोषणांचा निनाद झाला. यावेळी सामाजिक ऐक्य, राष्ट्रनिर्मिती व स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणाचा संदेश देण्यात आला.

या यात्रेत पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, पनवेल शहर माजी अध्यक्ष अनिल भगत, जयंत पगडे, ब्रिजेश पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, खारघर मंडल अध्यक्ष प्रविण पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, प्रभाकर बहिरा, अजय बहिरा, समीर ठाकूर, तेजस कांडपिळे, नरेश ठाकूर, गणेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी उपमहापौर सीता पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज, हेमलता म्हात्रे, सारिका भगत, अरुणा भगत, राजेश्री वावेकर, मोनिका महानवर, वर्षा नाईक, विद्या  तामखेडे, सपना पाटील, कामगार मोर्चा प्रदेश सचिव संजय भगत, अमित ओझे, अनेश ढवळे, दक्षिण मंडल अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर, सुनील गवंडी, विजय गवंडी, भाऊ भगत, सुशील शर्मा, शिवानी घरत, कोमल कोळी, रामनाथ पाटील, मधुकर उरणकर, राम पाटील, दीपक शिंदे, इर्शाद शेख, अमर उपाध्याय, विशाल म्हसकर, अजय तेजे, विश्वजीत पाटील, प्रीतम पाटील उर्फ पिंट्या म्हात्रे, महेश पाटील, केदार भगत, पवन सोनी, प्रवीण बेरा, प्रकाश खैरे, कीर्ती नवघरे यांच्यासह विद्यार्थी, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

कोट-

सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाचे एकत्रीकरण करून खऱ्या अर्थाने अखंड भारताची पायाभरणी केली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दृढ इच्छाशक्ती आणि राष्ट्रभावना आजच्या पिढीसाठी सर्वश्रेष्ठ प्रेरणा आहेत. या पदयात्रेद्वारे आपण एकीचा, विकासाचा आणि राष्ट्रहिताचा संदेश जनतेपर्यंत पोहचवत आहोत.नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग हेच सरदार पटेल यांच्या विचारांचे सामर्थ्य आहे. पनवेल ते शिरढोण पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद अभिमानास्पद आहे. ही पदयात्रा सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ठरली. – जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी 

Share

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *