पनवेल / क्षितिज पर्व
महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेने (MSPC) त्यांच्या औषध माहिती केंद्राद्वारे (Drug Information Centre), जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि उप्साला मॉनिटरिंग सेंटर, स्वीडन (UMC) यांच्या प्रेरणेने दिनांक ३ ते ९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत मेड सेफ्टी वीक २०२५ राज्यभरात साजरा
“Reporting makes medicines safer” ही या वर्षीच्या मेड सेफ्टी वीकची संकल्पना होती. यानिमित्ताने परिषदेच्या औषध माहिती केंद्र उपसमिती अध्यक्ष श्री. गणेश बंगाळे यांनी माननीय श्री. जगन्नाथ शिंदे-कार्यकारिणी सदस्य जे भारतीय औषध व्यवसाय परिषदचे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली औषधांच्या सुरक्षिततेचे संदेश केवळ आरोग्यसेवा व्यावसायिकांपर्त न ठेवता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश दाखवला.
ही संकल्पना साध्य करण्यासाठी, परिषदेने त्याच्या निरंतर व्यवसायिक विकास (CPD) या कार्यक्रमाशी संलग्न असलेल्या ५० हुन अधिक फार्मसी क्षेत्रातील प्राध्यापक आणि समन्वयकांना आरोग्य क्षेत्राबाहेरील संस्था, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी एक तासाचे जनजागृती सत्र आयोजित करण्याचे आवाहन केले. औषधांचा सुरक्षित वापर, औषधांचे दुष्परिणाम अहवाल (ADR) आणि रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात फार्मासिस्टची भूमिका यावर लक्ष केंद्रित केले.
अश्या एका आठवडवाडत, राज्यभरात २५ पेक्षा अधिक जनजागृती सत्रे व व्याख्याने पार पडली. पाटणे उद्यानांमध्ये, दुमरी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयांमध्ये संस्थांमध्ये बॅनर स्टँड, जिम, ग्रामचैताली, अशा विविध ठिकाणी सत्रे पार पडली. सकाळी ६:०० ते रात्री ९:०० पर्यंत सत्रे चालवली व औषध सुरक्षा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.या सत्रांद्वारे ३०,००० पेक्षा जास्त नागरिकांना फार्माकोविजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया (PvPI) केंद्रशुमार रिपोर्टिंग फार्म आणि QR कोड वापरून औषधाचा सुरक्षित वापर, साधनाळूक आणि औषधांचे दुष्परिणाम कसे नोंदवायचे हे शिकविण्यात आले. या मोहिमेमध्ये योगदान दिल्याबद्दल सर्व सहयोगी संस्थायंक आणि प्राध्यापकांना महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या वतीने डिजिटल प्रशस्तीपत्रक सर्व उपक्रमांचे स्मृतीचिन्ह म्हणून देण्यात आले. परिषदेच्या औषध माहिती केंद्राच्या तात्काळ सहायक डॉ. विनया कुलकर्णी यांचे विशेष आभार मानले व उपक्रमाचे संपूर्ण संयोजन यशस्वी होण्यात पार पाडले.
या उपक्रमाविषयी बोलताना श्री. अतुल अहिरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद म्हणाले:”महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत औषध सुरक्षा हा विषय माहितीपूर्ण करणे आमचे होते. या मोहिमेन यश सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी फार्मासिस्ट, शिक्षक आणि जनसामान्य यांनी एकत्रित प्रयत्न व सहयोगासह सामावले आहे.”
याविषयी परिषदेच्या निवेदक श्रीमती सायली स्वनिल मसाल यांनी टिपणी केली:”फार्मासिस्टनी आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन जनसामान्यांना उद्याने,शाळा, मंदिरे आणि बसस्थानके येथे भेटून काम केले आणि या उपक्रमास मिळालेले प्रतिसाद हा अभूतपूर्व आणि प्रेरणादायी होता”या उपक्रमाद्वारे, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद ही औषधांच्या तर्कसंगत आणि सुरक्षित वापरास प्रोत्साहन देण्यासाठी, फार्माकोविजिलन्समध्ये सक्रीय सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी आणि औषध सुरक्षा वृद्धीशी सुसंगत अशी आरोग्यसंस्कृती विकसित करण्यास वचनबद्ध आहे.
महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद
वचनबद्ध आहे.

संपादक – क्षितिज पर्व
संपर्क – 9594494771