क्षितिज पर्व News

वाकडी गावात भाजपाचा प्रचार जोरात; अनेकांचा जाहीर पक्ष प्रवेश

 

प्रतिनिधी : गणेश पाटील

वाकडी गावात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग दिसून आला. या प्रचारादरम्यान श्री. नाना जानू पाटील, हिराबाई नाना पाटील, माजी सरपंच भरत जानू पाटील, अमोल पाटील, लहू देहू पाटील (खाणाव) यांच्यासह अनेक मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केला.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. नरेशशेठ पाटील, नगरसेवक एकनाथ शेठ देशेकर, नगरसेवक दशरथ म्हात्रे, नगरसेविका लीना नंदुकुमार म्हात्रे, महेशशेठ पाटील (तोंडरे), सरपंच कुंदा बाळू पवार, शिवसेना तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे (खाणाव), डी. के. भोपी, शिवाजी दुर्गे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

 

नामदेवशेठ जमदाडे, रवी पाटील (मोरबे), सचिन दिसले, भाजप ग्रामीण युवा उपाध्यक्ष धनंजय पाटील, माजी उपसरपंच मंगेश पाटील, सदस्य नीता पाटील, प्रभावती खुटले (उपसरपंच), माजी सरपंच रंजना नरेशशेठ पाटील, सदस्या नंदिनी जमदाडे, जनार्दन पाटील, प्रल्हाद खुटले, सचिन पाटील साहेब, संतोष पाटील, संदीप पाटील, पद्माकर म्हस्कर, यशवंत खुटले, शशिकांत खुटले, बाळू पवार, रमेश पवार, अमित जमदाडे, लहू वाघ तसेच ग्रीन एकर सोसायटी, वास्तू सिद्धी सोसायटी व शांतिहार्मोनी सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी भाजपच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास व्यक्त करत येणाऱ्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. पक्ष प्रवेशामुळे वाकडी परिसरात भाजपची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र दिसून आले.

 

Share

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *