क्षितिज पर्व News

जनतेच्या विश्वासाला ज्येष्ठ कलाकारांचा आशीर्वाद

oplus_4194304

नामवंत गायक प्रेम धांदे यांचा अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांना पाठिंबा

पनवेल दै. क्षितिज पर्व

माजिक बांधिलकी, माणुसकी आणि आपुलकीचे दर्शन घडवत अ‍ॅड.सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांनी नामवंत गायक प्रेम धांदे यांची सदिच्छा भेट घेतली. प्रेम धांदे यांची प्रकृती बरी नसल्याचे समजताच कोणताही औपचारिकपणा न ठेवता एडवोकेट इंगळे यांनी तात्काळ त्यांच्या निवासस्थानी जाऊन विचारपूस केली. ही भेट केवळ औपचारिक नसून माणुसकीच्या नात्याची असल्याची भावना उपस्थितांमध्ये निर्माण झाली.या भेटीदरम्यान प्रेम धांदे यांनी अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांच्या सामाजिक कार्याची, सर्वसामान्यांप्रती असलेल्या संवेदनशीलतेची व न्यायासाठी चालवलेल्या लढ्याची मनापासून प्रशंसा केली. भावुक होत त्यांनी शुभाशीर्वाद देत ठाम शब्दांत सांगितले,“यावेळी नगरसेवक तुम्हीच असाल”,असे म्हणत त्यांनी एडवोकेट इंगळे यांना निवडणूक लढतीसाठी मोलाचे प्रोत्साहन दिले.ज्येष्ठ व नामवंत कलाकाराकडून मिळालेला हा आशीर्वाद म्हणजे जनतेच्या विश्वासाचीच पावती असल्याचे बोलले जात आहे. संस्कृती, कला आणि समाजाशी नाते जपणाऱ्या नेतृत्वाची आज गरज असून अ‍ॅड.सिद्धार्थ सोनाजी इंगळे हे त्या अपेक्षांना पात्र उमेदवार असल्याची भावना या भेटीतून व्यक्त झाली.या प्रसंगी अ‍ॅड.इंगळे यांनी, “प्रेम धांदे यांचे आशीर्वाद माझ्यासाठी शक्तीस्त्रोत आहेत. जनतेच्या न्यायहक्कासाठी, विकासासाठी आणि स्वच्छ, पारदर्शक कारभारासाठी मी अधिक जोमाने काम करेन,” असा विश्वास व्यक्त केला.ज्येष्ठांचा आशीर्वाद, जनतेचा विश्वास आणि तरुणाईचा उत्साह याच्या बळावर अ‍ॅड.सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांची उमेदवारी अधिक भक्कम होत असल्याचे चित्र सध्या पनवेल परिसरात दिसून येत आहे.

Share

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *