लोणावळा / दै. क्षितिज पर्व
पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळा परिसरात आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अचानक वाढलेली वाहनसंख्या, रस्त्यावरील संथगती वाहतूक आणि काही ठिकाणी बिघडलेली वाहने यामुळे हायवेवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी जनतेची अक्षरशः तारांबळ उडाली.
या कोंडीत अनेक प्रवासी तासन्तास अडकून पडले. खासगी वाहनांसह बस, मालवाहू ट्रक यांचीही मोठी गर्दी झाल्याने प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाढला. कामानिमित्त तसेच सुट्टीच्या दिवसामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
वाहतूक कोंडीमुळे काही ठिकाणी आपत्कालीन सेवांच्या वाहनांनाही अडथळा निर्माण झाला. वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र वाहनांची संख्या अधिक असल्याने कोंडी सोडवण्यास वेळ लागला.
दरम्यान, प्रवाशांनी प्रशासनाकडून योग्य वाहतूक नियोजन, पर्यायी मार्गांची व्यवस्था आणि तातडीने कोंडी सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

संपादक – क्षितिज पर्व
संपर्क – 9594494771