पनवेल : पनवेल महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर शहरतर्फे प्रभाग क्रमांक १६ (सर्वसाधारण) या जागेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया पार पडली. या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे पनवेल जिल्हाध्यक्ष मा. दीपक गायकवाड तसेच पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड हे प्रमुख उपस्थित होते.

नुकतेच पनवेल महापालिकेने 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी आणि आरक्षण सोडत जाहीर केल्यानंतर विविध पक्षांनी उमेदवार निवड प्रक्रिया गतिमान केली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने प्रभाग १६ साठी स्थानिक पातळीवरील सक्रिय आणि इच्छुक कार्यकर्त्यांकडून अर्ज मागवून त्यांची मुलाखत घेण्याची लोकशाही प्रक्रिया राबवली आहे.
बैठकीत आगामी निवडणुकीत बहुजन, वंचित, अल्पभूधारक आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा सक्षम उमेदवार उभा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. लवकरच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १६ साठी अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

संपादक – क्षितिज पर्व
संपर्क – 9594494771