पनवेल : वंचित बहुजन आघाडी, पनवेल महानगरातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रभावी वक्ते कुमार (बाळासाहेब) मेटांगे यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्ष प्रवेश केला. या वेळी त्यांची वंचित बहुजन आघाडी, पनवेल महानगर प्रवक्ते म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आयु. आनंद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली 16 डिसेंबर रोजी पनवेल महानगर कमिटीची तातडीची बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या रणनीती आणि संघटन बळकटीसंदर्भात या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान कुमार (बाळासाहेब) मेटांगे यांचा पक्ष प्रवेश आणि प्रवक्तेपदाची निवड जाहीर होताच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सत्कार करून अभिनंदन केले. पक्षाच्या विचारधारेचा प्रसार आणि पनवेल महानगरातील वंचित घटकांपर्यंत पोहोच वाढविण्यासाठी मेटांगे यांच्या अनुभवाचा मोठा उपयोग होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमास पनवेल महानगर अध्यक्ष आयु. आनंद गायकवाड, महासचिव संतोष मुजमुले, महासचिव अविनाश अडागळे, उपाध्यक्ष डॉ. छायाताई शिरसाट, कविताताई वाघमारे, भालचंद्र शिंदे, सतीश अहिरे, सचिव विजय घोबाळे, राजेश रणधीरे, कोषाध्यक्ष चंद्रकांत नवगिरे, संघटक भागुराम भेकरे, प्रसिद्धी प्रमुख राहुल चव्हाण, सदस्य सलाम साठी, लहू भुतेकर यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल परिसरातील आगामी राजकीय घडामोडींना या प्रवेशामुळे नवे स्वरूप येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संपादक – क्षितिज पर्व
संपर्क – 9594494771