क्षितिज पर्व News

‘सुखकर्ता’वर संजय गवळी यांचा वाढदिवस साजरा..

उलवे / क्षितीज पर्व

कर्जत तालुकाध्यक्ष आणि केरळचे रहिवासी संजय शरद गवळी यांचा वाढदिवस ‘सुखकर्ता’ बंगल्यावर सोमवारी (ता. १७) साजरा करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी कर्जत तालुकाध्यक्ष संजय गवळी म्हणाले, “महेंद्रशेठ घरत हे कार्यकर्त्यांसाठी टॉनिक आहेत, ते कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात आवर्जून उपस्थित असतात. त्यांच्यामुळेच आज रायगड जिल्ह्यात काँग्रेस जिवंत आहे, असे मी म्हणू शकतो. कारण स्वतःच्या पैशांतून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आर्थिक आणि मानसिक ताकद देणारे ते एकमेव आहेत. तळागाळातील कार्यकर्ता त्यांच्याकडे आशेने पाहातोय, कारण त्यांच्या छोट्यामोठ्या गरजा महेंद्रशेठ घरत पुरवतात. त्यामुळे त्यांच्याकडून वाढदिवस साजरा होणे हे माझे भाग्य आहे.”
यावेळी गव्हाण विभागातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *